टिळकवाडी परिसरात वारंवार रेल्वे थांबत असल्यामुळे नागरिकांना मनस्ताप : रेल्वे विभाग अपघात होण्याची वाट पहात आहे का?
प्रतिनिधी /बेळगाव
टिळकवाडी परिसरात वरचेवर रेल्वे थांबत असल्यामुळे याचा मनस्ताप नागरिकांना होत आहे. तरी काहीजण जीव धोक्मयात घालून थांबलेल्या रेल्वेतून एका बाजूने दुसऱया बाजूला ये-जा करीत आहेत. रेल्वेच्या अनागोंदी कारभारामुळे सर्वसामान्यांचा जीव धोक्मयात आला आहे. एखाद्या निष्पापाचा जीव गेल्यानंतरच रेल्वे प्रशासनाला जाग येणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
पहिले व दुसरे रेल्वेगेट परिसरात वरचेवर रेल्वे थांबत आहे. देसूरवरून येणाऱया रेल्वेला रेल्वेस्थानकातून सिग्नल मिळत नसल्यामुळे रेल्वे टिळकवाडी परिसरात थांबत आहेत. सिग्नल मिळाल्यानंतरच रेल्वे मार्गस्थ होत आहेत. मागील चार दिवसांत 2 ते 3 वेळा असे प्रकार घडल्याने वाहनचालक रेल्वेगेटनजीक ताटकळत थांबत आहेत. आधीच नवीन रेल्वेगेट बसविल्यापासून अनेक समस्या येत असताना आता त्यामध्ये भर पडताना दिसत आहे.
रविवार दि. 24 रोजी म्हैसूर-दादर एक्स्प्रेस तब्बल 45 मिनिटे टिळकवाडी येथे थांबून होती. मंगळवार दि. 26 रोजी वास्को-निजामुद्दीन एक्स्प्रेस 7 ते 8 मिनिटे थांबली होती. रेल्वे येण्यापूर्वी 5 मिनिटे गेट बंद केले जाते व गेल्यानंतर 5 मिनिटांनी उघडते. यामुळे 15 ते 20 मिनिटे गेट बंद ठेवण्यात येत असल्यामुळे एका बाजूने दुसऱया बाजूला जाणाऱयांचे हाल होत आहेत. टिळकवाडी येथे शाळा, महाविद्यालये असल्याने त्यांना उशीर होत आहे.
रेल्वेतून नागरिकांची ये-जा
बराच वेळ गेटनजीक रेल्वे थांबत असल्यामुळे नागरिक उभ्या असणाऱया रेल्वेतून गेटच्या एका बाजूने दुसऱया बाजूला ये-जा करीत आहेत. शालेय विद्यार्थी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक आहे. रेल्वे सुरू होताच उडी मारून विद्यार्थी बाहेर पडत आहेत. असे प्रकार वारंवार होत असून रेल्वे विभाग अपघात होण्याची वाट पहात आहे का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.
अधिकारीवर्गाचेही दुर्लक्ष…
रेल्वेगेटनजीक रेल्वे थांबल्याने त्याचा त्रास विद्यार्थी, त्यांचे पालक, व्यापारी, नोकरदारांना होत आहे. नैर्त्रुत्य रेल्वेकडे तक्रार करूनही त्यांच्याकडून या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. हुबळी येथील वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधल्यास त्यांच्याकडून समर्पक उत्तरे देण्यात येत नसल्याने दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्न निर्माण होत आहे.









