नवी दिल्ली
रेल्वेने प्रवास करू इच्छिणाऱयांना आता रात्री 11.30 नंतर तिकीट बुकिंग करता येणार नाही. जवळपास 6 तास ही सेवा बंद राहणार असल्याचे भारतीय रेल्वेने म्हटले आहे. 14 व 15 नोव्हेंबर मध्यरात्रीपासून (रात्री 11.30) ते 21 नोव्हेंबरपर्यंत पहाटे 5.30 वाजेपर्यंत रेल्वे तिकीट बुकिंग सेवा बंद राहणार आहे. कोरोना कमी झाला असून आता रेल्वेसेवा सामान्य करण्यावर भर दिसतो आहे. तिकीट बुकिंगसह कॅन्सलिंग (रद्द) प्रक्रियाही वरील वेळेत करता येणार नाही.









