16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रेल्वेच्या खासगीकरणाला गती देण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झालेल्या दिसत आहेत. ठराविक मार्गांवर खासगी रेल्वे चालवण्यासंबंधी सरकारकडून मागविण्यात आलेल्या अर्ज प्रक्रियेला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे दिसत आहे. आतापर्यंत एकूण 16 खासगी कंपन्यांकडून 120 अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांची छाननी करून त्या कंपन्यांच्या नावांना अंतिम स्वरुप देण्यास सुरूवात झाली आहे.
भारत सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाला यापूर्वीच परवानगी दिली आहे. या परवानगीनंतर अनेक कंपन्यांनी प्रवासी खासगी रेल्वे चालवण्यास उत्सुकता दाखवत आपले अर्ज सादर केले आहेत. रेल्वेच्या खासगीकरणामध्ये पहिल्या टप्प्यात 12 टेन्स चालवल्या जाणार आहेत. या खासगी टेन कोण चालवणार यासंदर्भात रेल्वे मंत्रालयाने अर्ज मागवले होते. कंपन्यांची निवड दोन टप्प्यात पारदर्शी पद्धतीने केली जाणार आहे.









