नवी दिल्ली / वृत्तसंस्था
केंदीय मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर नवीन रेल्वेमंत्र्यांच्या आदेशानुसार रेल्वे कर्मचाऱयांच्या कामाच्या वेळा आता बदलण्यात आल्या आहेत. रेल्वे कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील असा आदेश रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी काढला आहे. पहिली शिफ्ट सकाळी 7 ते 4 आणि दुसरी शिफ्ट दुपारी 3 ते रात्री 12 वाजेपर्यंत असणार आहे. या आदेशाची तातडीने अंमलबजावणी सुरू झाली आहे, अशी माहिती रेल्वे मंत्रालयाचे एडीजी पीआर डी. जे. नारायण यांनी दिली आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात विस्तार करण्यात आल्यानंतर पियुष गोयल यांचे रेल्वे खाते काढून अश्विनी वैष्णव यांच्याकडे देण्यात आले आहे. माजी आयएएस अधिकारी असणाऱया अश्विनी वैष्णव यांनी पदभार स्वीकारून कामकाजाला सुरुवात केली. त्यानंतर रेल्वेमंत्र्यांनी सर्व कार्यालये आणि मंत्र्यांच्या कार्यालयातील कर्मचारी दोन शिफ्टमध्ये काम करतील, असा आदेश दिला आहे.









