प्रतिनिधी / बेळगाव
तिसऱया रेल्वेगेटजवळील उड्डाणपूलावर गर्डर बसविण्याचे काम शनिवारी पूर्ण झाले. शुक्रवारी या कामाला प्रारंभ झाला होता. शनिवारी हा संपूर्ण गर्डर उड्डाणपूलावर बसविण्यात आला. गर्डर बसविण्यापूर्वी रेल्वेखात्यातर्फे हिरवा कंदिल मिळणे आवश्यक असते. शुक्रवारी केवळ दोन ते तीन तास रेल्वेखात्याने दिले होते. मात्र शनिवारी यापेक्षा अधिक कालावधी मिळाल्याने गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाले. मे च्या पहिल्या आठवडय़ापर्यंत या पूलाचे संपूर्ण काम होईल, असा विश्वास कंपनीच्या सुत्रांनी व्यक्त केला आहे.









