रत्नागिरीतील आरटीओ रेल्वे पुलाखालच्या दुसऱया घटनेने खळबळ
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरानजीकच्या आरटीओ रेल्वे पुलावर ट्रेनपुढे झोकून देत तरुणाने आत्महत्या केल्याची सलग दुसरी घटना समोर आली आह़े राजेंद रवींद्र सावंत (22, ऱा वळके बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृताचे नाव आह़े रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास रेल्वे पोलिसांना राजेंद्र याचा मृतदेह रेल्वे रूळावर आढळून आल़ा शुक्रवारी टिके येथील तरुणाने याच ठिकाणी आत्महत्या केली होती. सलग दुसऱया घटनेने खळबळ उडाली आह़े
राजेंद्र याच्या मृत्यूप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आल़ा तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आल़ा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र हा रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे घरातून बाहेर पडला होत़ा यानंतर रविवारी दुपारी 12 च्या सुमारास आरटीओ रेल्वेपूल येथील रेल्वे रूळावर मृतदेह पडून असल्याचे रेल्वे पोलिसांकडून शहर पोलिसांना कळविण्यात आल़े मृताची ओळख पटवण्याचे काम केले असता तो वळके येथील राजेद्र सावंत याचा असल्याचे निष्पन्न झाल़े
याबाबत राजेंद्र याचे काका शुभानंद माणिक सावंत (ऱा वळके) यांनी शहर पोलिसात खबर दिल़ी राजेंद्र याने नेमकी कोणत्या कारणावरून आत्महत्या केली, याबाबत पोलिसांकडून तपास करण्यात येत आह़े दरम्यान आरटीओ पुलावर रेल्वेपुढे स्वतःला झोकून देत आत्महत्या करण्याची ही सलग दुसरी घटना ठरली आह़े शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील टिके भातडेवाडी येथील प्रणव कृष्णा सनगरे (24) या तरुणानेही आरटीओ पुलावर आत्महत्या केली होत़ी प्रणव याने शुक्रवारी सायंकाळी कोच्चिवली-भावनगर एक्सप्रेस गाडीसमोर स्वतःला झोकून दिल़े रेल्वेच्या धडकेत प्रणव याचा जागीच मृत्यू झाल़ा कोकण रेल्वेचे ट्रकमन यांना सायंकाळी प्रणव याचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळून आल़ा प्रणव याचे मे 2022 मध्ये लग्न झाले होत़े लग्नाला केवळ 4 महिने झाले असताना आत्महत्येसारखे पाऊल प्रणव याने का उचलले, हे समजू शकलेले नाह़ी दोन्ही आत्महत्यांच्या घटनांचा तपास शहर पोलिसांकडून करण्यात येत आहे.









