बार्शी / प्रतिनिधी
बार्शी कासारवाडी रस्त्या वरील हॉटेल शिवरेखा नजीक असणारे रेल्वेच्या फाटकातील रुळाचे दुरुस्तीचे काम चालू असल्याने गेल्या 24 तासा पासून हा रस्ता बंद आहे. मात्र हे काम पाच तासांमध्ये होणे अपेक्षित असताना रेल्वेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज दिवसभर बार्शी कुर्डवाडी कासरवाडी हा रस्ता बंद आहे.
बार्शी ते कासारवाडी हा रस्ता खूप रहदारीचा आहे. बार्शी शहराला कासारवाडी ,कव्हे, कोरफळे ,मालवंडी गावांना जोडणारा हा महत्त्वाचा रस्ता आहे . या सर्व गावांना बार्शी ही मध्यवर्ती बाजारपेठ असल्याने दैनंदिन गरजांसाठी व खरेदीसाठी रोज बार्शीला यावे लागते त्यामुळे या रस्त्यावरती रहदारी जास्त प्रमाणात असते. याच रोडवर रेल्वे रूळ असल्याने या ठिकाणी फाटक आहे. याच फाटकावर रुळ दुरुस्तीचे काम चालू आहे. अर्थात हे काम पाच तासांमध्ये पूर्ण वेळ त्यामुळे पाच तास वाहतूक बंद राहील असे रेल्वे प्रशासनाने एसटी महामंडळाला पत्र दिले आहे मात्र गेली 18 तास झाले तरी हे काम चालू असल्याने हा रस्ता पूर्णपणे बंद आहे. रेल्वे प्रशासनाने या कामाविषयी स्थानिक वर्तमानपत्रे किंवा इतर माध्यमातून या कामाची माहिती देणे आवश्यक असताना सुद्धा अशी माहिती देण्यात आलेली नाही त्यामुळे अनेक नागरिक या रस्त्यावर स्थिती पाच-सहा किलोमीटर पर्यंत येऊन परत वापस जात पर्यायी मार्गाने जात आहेत.
या कामाविषयी काम करत असलेले ठेकेदार यांना विचारले असता त्यांनी सांगितले की रेल्वे दुरूस्ती ची मशीन उशिरा आल्याने या कामाला उशीर होत आहे याविषयी बार्शी रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना विचारण्यासाठी फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. नियोजन आणि अचूक वेळ पाळणे हे रेल्वेचे कर्तव्य आणि या विषयाची कार्यप्रणाली जगप्रसिद्ध असताना बार्शीत मात्र रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ आणि नियोजन शून्य कामामुळे नागरिकांना त्रास होत आहे