वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रेल्वेने आगामी 2030 पर्यंत विविध उपाययोजना लागू करुन निर्माण होणारे कार्बन उत्सर्जन शुन्यावर आणण्यासाठीचे ध्येय निश्चित केले असल्याचे सांगितले आहे. याबाबतची माहिती रेल्वेने नुकतीच दिली आहे. सदरचे ध्येय प्राप्त करण्यासाठी रेल्वे लाईनचे विद्युतीकरण, ऊर्जा दक्षतेमध्ये सुधारणा व अक्षय ऊर्जा स्रोताचा वापर करण्यावर भर देण्यात येणार असल्याचे रेल्वेने स्पष्ट केले आहे.
रेल्वे येणाऱया काळात सर्व मार्गावर डिसेंबर 2023 पर्यंत विद्युतीकरण करण्यावर भर देणार आहे. रेल्वे इंजिन आणि त्यांच्या ऊर्जा क्षमतेत सुधारणा करण्यावर भर दिला जाणार आहे.
आगामी नियोजनावर भर
रेल्वे आपल्या डब्यात जैव शौचालयाची उभारणी करणार असून यातून ऊर्जा निर्मितीची गरज प्राप्त करणार असून यातून शुन्य कार्बन उत्सर्जन प्राप्तीसाठी यंत्रणेमार्फत प्रयत्न केला जाणार आहे. दुसरी बाब म्हणजे रेल्वे 40 हजार किमी पेक्षा जादा अंतराच्या विद्युतीकरणावर भर देणार आहे. जो ब्रॉडगेज मार्गाच्या 63 टक्के आहे.
विद्युतीकरणाचा वेग
2014-20 च्या कालावधीत 18,605 किलोमीटरचा रेल्वेमार्ग विद्युतीकरण केले आहे. जे 2009-14 च्या दरम्यान 3,835 किलोमीटरचा मार्ग विद्युतीकरणातून पूर्ण केला आहे तर कोविड 19 च्या महामारीच्या कालावधीत 365 किलोमीटर प्रमुख संपर्क मार्गांचे काम पूर्ण केले आहे.









