जुलै 2021 मधील आकडेवारी सादर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारतीय रेल्वेने जुलै 2021 मध्ये जुलै 2020 च्या तुलनेत जवळपास 18.43 टक्क्यांच्या वाढीसह रेल्वेतून 1.75 कोटी टनाची मालवाहतूक करण्यात आली आहे. यासोबतच आतापर्यंत सर्वाधिक 11.27 कोटी टन मालवाहतूक केली आहे. ज्यामध्ये या अगोदर जुलै 2019 मध्ये 9.97 कोटी टनासोबत रेल्वेने समाधानकारक कामगिरी केली हाच आकडा जुलै 2020 मध्ये 9.51 कोटी टन राहिला होता.
प्रमुख उत्पादनापैकी जुलै 2021 च्या महिन्यात कोळशाची वाहतूक 93.1 लाख टन राहिले, सिमेंटच्या क्षेत्रात वाहतूक 26.71 टक्क्यांनी वाढून 23.1 लाख टनावर पोहोचली असून हा आकडा जुलै 2020 च्या तुलनेत 23.47 टक्क्यांनी अधिक आहे, यासोबतच पोलाद क्षेत्राचा आकडा हा 8.72 टक्क्यांनी वाढून 4.5 लाख टनावर पोहोचला आहे. पोलादाच्या कच्च्या मालाची देवाणघेवाण ही 48.62 टक्क्यांनी वाढून 8.8 लाख टनावर राहिली आहे. याच्या व्यतिरिक्त खाद्यान्नांची उलाढाल 7.89 टक्क्यांनी
वाढून 4.3 लाख टनावर पोहोचली आहे.









