प्रतिनिधी, बेळगाव
न्युगांधीनगरजवळ एका तरुणाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून त्याच्या खिशात आधारकार्ड आढळून आला आहे. त्याच्यावर सागर (रा. गोंधळी गल्ली) असा उल्लेख आहे. रेल्वे पोलीस पुढील तपास करीत आहेत.









