लखनौ
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौमध्ये दुहेरी हत्येचे प्रकरण समोर आले आहे. भारतीय रेल्वेसेवेचे वरिष्ठ अधिकारी आर.डी. वाजपेयी यांच्या निवासस्थानात हा गुन्हा घडला आहे. गुन्हेगारांनी वाजपेयींच्या घरात घुसून त्यांची पत्नी आणि मुलाला गोळय़ा घातल्या आहेत. गुन्हय़ाचे गांभीर्य पाहता पोलीस महासंचालक हितेशचंद्र अवस्थी यांनीच घटनास्थळी धाव घेतली आहे. दोघांची हत्या घरातील दरोडय़ादरम्यान झाल्याची चर्चा आहे. परंतु पोलिसांनी यासंबंधी काहीही सांगण्यास नकार दिला आहे. अनेक मंत्री आणि अधिकाऱयांची निवासस्थाने असलेल्या परिसरात हा गुन्हा घडला आहे. मुख्यमंत्री निवासस्थान आणि राजभवन देखील 100 मीटरच्या कक्षेत आहे. मोठा बंदोबस्त असूनही या भागात दुहेरी हत्या घडल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.









