जिनेव्हा
कोरोनावर उपयुक्त ठरत असल्याचे सांगण्यात येणाऱया रेमीडिसेव्हीर या औषधावर जागतिक आरोग्य संघटनेने बंदी घातली आहे. कोरोनावर उपयुक्त ठरणाऱया औषधांच्या सूचीतून या औषधाला हटविण्यात आले आहे. रूग्णालयात उपचार घेत असलेल्या रूग्णांवर या औषधाचा प्रयोग करण्यात येऊ नये, अशी सूचना संघटनेने केली आहे. या औषधाचे उत्पादन करणाऱया दसेच त्याची अन्य देशांकडून खरेदी करणाऱया देशांना हा इशारा मानण्यात येत आहे. यापूर्वी हे औषध अत्यंत प्रभावी असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे अनेक देशांनी त्याची खरेदी किंवा उत्पादन करण्याचा विचार चालविला होता. आता परिस्थिती बदलली आहे.









