कक्षासाठी चार अधिकाऱयांची नियुक्ती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्यात रेमडेसीव्हीर तुटवड्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱयांनी मंगळवारी कोल्हापुर जिल्हाल्यात नियंत्रण कक्ष स्थापन केला. त्यासाठी चार अधिकाऱयांची नियुक्ती केली आहे.
जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. रूग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभुमीवर प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये रेमडेसीव्हीर इंजेक्शनची मागणी वाढत आहे. तसेच खासगी औषध दुकानातून त्याची जादा दराने विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रेमडेसीव्हीरचा काळाबाजार अन् साठेबाजी रोखण्यासाठी विक्री, वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. या नियंत्रण कक्षाशी 0231 : 2659232, 2652950, 2652953, 2652954 व टोल फ्री 1077 यावर रूग्णांच्या नातेवाईकांनी संपर्क साधावा.
रेमडेसीव्हीर नियंत्रण कक्षाच्या प्रमुख अन्न औषध प्रशासनाच्या सहायक आयुक्त सपना कुपेकर आहेत, समन्वय अधिकारी, औषध निरीक्षक मनोज अय्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आहेत. याशिवा अन्न सुरक्षा अधिकारी ए. बी. कोळी, आर. पी. पाटील, एम. आर. मासाळ, व्ही. एन. उनउणे यांची नियुक्ती केली आहे. कोरोना हॉस्पिटलनी रेमडेसीव्हीरची मागणी नियंत्रण कक्षाकडे करावी, ही यादी वितरकाकडे दिल्यानंतर थेट हॉस्पिटलला रेमडेसीव्हीर दिली जाणार आहेत. उत्पादक कंपन्यांनी पुरवलेल्या रेमडेसीव्हीरची माहिती नियंत्रण कक्षाला द्यावी, अशा सुचनाही जिल्हाधिकारी देसाई यांनी दिल्या.









