नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
सध्या महाराष्ट्रातील राजकारण रेमडेसिविरच्या साठेबाजीवरून चांगलेच तापले आहे. मुंबई पोलिसांनी रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा केल्याचा संशय असलेल्या ब्रुक फार्माच्या संचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप नेते मध्यरात्रीच पोलीस स्टेशनमध्ये पोलीस ठाण्यात पोहचले. पोलिसांनी यावेळी त्यांना फक्त चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याचं सांगितलं. आता काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनी रेमडेसिवीर खरेदी प्रकरणी देवेंद्र फडणवीस यांच्या चौकशीची मागणी केली आहे. यासोबतच त्यांनी ही घटना लाजिरवणी असल्याचे देखील म्हटले आहे.
दिग्विजय सिंह यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, खरं तर फडणवीसांनी कोणत्या खात्यातून साडे चार कोटींचे रेमडेसीवीर खरेदी केले याची चौकशी झाली पाहिजे. तसंच कोणाच्या परवानगीने केले याचीही चौकशी झाली पाहिजे. ही अत्यंत लाजिरवणी घटना असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








