सोलापूर / प्रतिनिधी
कोविड महामारीचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. सोलापुरात रुग्णांची वाढ होतआहे. रुग्णांना रेमडीसिविर इंजेक्शनचा कोर्स देण्यात येत आहे. गेले चार दिवस सोलापूरमध्ये ह्या औषधाचा तुटवडा होत असून हे औषध उपलब्ध होत नाही. ह्यामुळे पेशंट व त्यांच्या नातेवाईकांना खूपच मानसिक ताण येत आहे. हे औषध मिळवायला पळापळ होत आहे. त्यामुळे रेमडीसिवीर इंजेक्शन तुटवडा दूर करा अशा मागणीचे निवेदन, मनपा आयुक्त, जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
काही ठिकाणी अधिक दर आकारले जाण्याच्या तक्रारी ही येत आहेत. तात्काळ योग्य ते उपाय योजना करून रेमडीसिविर इंजेक्शनचा सोलापूर शहर व जिल्ह्याला तुटवडा होणार नाही ह्याची दक्षता घ्यावी तसेच भविष्यात अंदाजे लागू पडणार्या ह्या औषधांचा साठा सुनिशचित करावा. आम आदमी पार्टी ह्या कोविड महामारीत प्रशासनस साथ देईल व बाधित जनतेला पुरेपूर मदत व सहयोग करेल अशी ग्वाही ही आम आदमी पार्टी तर्फे निवेदनाद्वारे देण्यात आले.
आयुक्त सो.म.पा., जिल्हाधिकारी सोलापूर यांचे सोबत चर्चा करून रेमडेसिवीर औषधाचे अखंडित पुरवठा करण्याचे आश्वासन दिले.
याप्रसंगी आम आदमी पार्टी सोलापूर शहराध्यक्ष मो. अस्लम शेख, युवाध्यक्ष निहाल किरनळ्ळी, इम्रान मुजावर, अय्युब फुलमाम्डी आदी उपस्थित होते.









