सोलापूर : प्रतिनिधी
सर्वसामान्य नागारिकांसाठी खरेदी केलेले व माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी राज्यात तुडवडा असताना खास सोलापूरसाठी 80 रेमडेसिवीर इंजेक्शन्स उपलब्ध करून दिले होते. परंतु याच्या वापराबाबत घोळ झाल्याचे `तरूण भारत संवाद’ने निदर्शनास आणून दिले. हे वृत्त समजताच पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा प्रशासनावर कडाडले असून याची चौकशी करून संबंधीत दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सोलापुरातील कोरोनाची वाढती संख्या आणि रेमडिसीवीर इंजेक्शनचा तुडवडा लक्षात घेता माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी 80 रेमडिसिवीर इंजेक्शन जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध करुन दिले होते. तसेच मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर आणि जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. प्रदिप ढेले यांनी आणखी प्रत्येकी तीनशेहून अधिक रेमडिसीवीर इंजेक्शन खरेदी केले आहेत. तसेच आरोग्य मंत्रालय, राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत इंजेक्शन प्राप्त झाले आहेत. परंतु सदरचे इंजेक्शन ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी व शहरासाठी मनपा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव यांनी वापरली नसल्याचे सांगितले. त्यामुळे सदरच्या इंजेक्शनचा वापर कोणी केला आणि इंजेक्शन कुठे गेले? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर पालकमंत्री भरणे यांनी लक्ष केंद्रीत केले असून या प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार असल्याचे सांगितले.
Previous Articleकोल्हापुरात जम्बो कोविड सेंटरची उभारणी करा
Next Article कोल्हापूर : म.फुले स्मृतीदिनी शिक्षक दिन साजरा करावा









