बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याबरोबरच रेमडेसिवीर इंजेक्शन नसल्याच्या आणि काळ्याबाजाराच्या तक्रारी होत असताना राज्याचे आरोग्य व वैद्यकीय शिक्षण मंत्री डॉ. के. सुधाकर यांनी, सरकार ८४ हजार रेमडेसिवीरचे डोस खरेदी करणार असल्याचे म्हंटले आहे. त्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.तसेच राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनची कमतरता भासू नये यासाठी आधीच तयारी करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात स्वतंत्र यंत्रणा उभारण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत.
मंत्री सुधाकर यांनी दुसर्या लाटेत संक्रमित झालेल्या ९५ टक्के रुग्णांमध्ये शून्य किंवा सौम्य लक्षणे आढळली आहेत. केवळ पाच टक्के रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक आहे. केवळ गंभीर लक्षणे असलेल्यांनाच रुग्णालयात उपचारांसाठी जावे लागत आहे. तसेच केवळ कोविडमधील गंभीर रूग्णांना रुग्णालयात दाखल करण्याच्या सूचना देखील खासगी रुग्णालयांना देण्यात आल्या आहेत.









