ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने देशात ‘रेमडेसिवीर’ची कमतरता निर्माण झाली आहे.त्यामुळे ‘रेमडेसिवीर’ची उत्पादन क्षमता तिप्पट करण्यात आली असून, लवकरच देशाची वाढती मागणी आपण पूर्ण करू, असे केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी आज सांगितले.
12 एप्रिल रोजी देशात रेमडेसिवीरचे उत्पादन 37 लाख शिशा होते. ते आता दरमहा 1.06 कोटी शिशा आहे.









