पेइचिंग
पृथ्वीवर आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी विविध प्रकारची योजना आखण्यासाठी विविध देश प्रयत्न करण्याच्या तयारीत असतात. या स्पर्धेत आता चीन आणि अमेरिका या दोन महासत्तांमध्ये सध्या चीन विश्वावर अधिराज्य निर्माण करण्याच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळत आहे. यासाठी जगातील सर्वात मोठय़ा सिंगल अपर्चर टेलिस्कोपच्या आधारे चीन पर ग्रहावरील एलियन ग्रहांचा शोध घेण्याचे काम करणार असल्याचे सांगितले आहे. 500 मीटर अंतराचे रेडिओ टेलिस्कोप हे पहिल्या टेलिस्कोपच्या दुप्पट जागा व्यापणारे आहे. याचे रीडिंग 3 ते 5 पट जादा स्पष्ट राहणार आहे. सदरचे टेलिस्कोप हे जानेवारीपासून काम करत आहे. प् आतापर्यंत विविध प्रकारच्या माहितीमधून परग्रहावर जीवसुष्टी असल्याचे संकेत मिळत असल्याचे पेइचिंग नॉर्मल विद्यापीठाचे या योजनेचे प्रमुख शास्त्रज्ञ ऍस्ट्रोनॉमर झांग तेंगजी यांनी सांगितले आहे.









