वृत्तसंस्था/ हेर्टोजेनबॉश
येथे सुरू असलेल्या एटीपी टूरवरील पुरुषांच्या हेर्टोजेनबॉश टेनिस स्पर्धेत कॅनडाच्या मिलोस रेऑनिकने एकेरीत विजयी सलामी दिली. तब्बल दोन वर्षांच्या कालावधीनंतरचा रेऑनिकचा हा पहिला विजय आहे. दुखापतीमुळे रेऑनिकला दोन वर्षे टेनिस क्षेत्रापासून अलिप्त राहावे लागले होते.
या स्पर्धेतील झालेल्या पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात रेऑनिकने केमेनोव्हिकचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.








