वृत्तसंस्था/ पोर्ट एलिझाबेथ
दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या तिसऱया कसोटीतील खेळाच्या पाचव्या दिवशी इंग्लंडचा जो रूटने गोलंदाजी करताना एका षटकांत 28 धावा देण्याच्या विक्रमाशी बरोबरी केली.
दक्षिण आफ्रिकेचा तळाचा फलंदाज केशव महाराजने रूटच्या या षटकांत 4,4,4,6,6,4 बाईज अशा एकूण 28 धावा घेतल्या. यापूर्वी पर्थ आणि पोर्ट एलिझाबेथ येथील सामन्यात रॉबिन पीटरसन आणि जेम्स अँडरसन यांनी आपल्या एका षटकांत 28 धावा दिल्या होत्या. इंग्लंडने तिसऱया कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा एक डाव आणि 53 धावांनी पराभव केला. या मालिकेत आता इंग्लंडने 2-1 अशी आघाडी घेतली असून शेवटचा आणि चौथा सामना 24 जानेवारीपासून खेळविला जाणार आहे.