बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. रुग्णसंख्या वाढत असताना काही धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. एका कोरोना बाधित व्यक्तीला बेड अभावी उपचारासाठी रुग्नाला दाखल करून घेतले नाही. कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांनी बेड उपलब्ध नसल्याबद्दल चिंता व्यक्त करताना रूग्णालयांनी रूग्णांना उपचारासाठी नाकारणे हा प्रकार धक्कादायक असल्याचे गुरुवारी म्हंटले आहे.
कुमारस्वामी यांनी सरकारवर टीका करताना “सरकार नागरिकांचे संरक्षण करण्याचे कर्तव्य पार पडण्यास अपयशी ठरले आहे. मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांनी गेल्या तीन महिन्यांपासून केवळ बोलण्यात वेळ घालवला. कोरोना बाधितांच्या संख्या वाढत असल्याने आता हे असहाय झाले असल्याचे ते म्हणाले.
तसेच मंत्रिमंडळामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचा आरोप करत “कोविड व्यवस्थापनात केरळ सरकारच्या यशाबद्दल कौतुक करत आपल्याकडे सुद्धा असे मॉडेल असतानाही मंत्री विरोधाभासी विधाने करण्यात वेळ घालवतात आणि उपाययोजनेसाठी काहीच करत नाहीत. सहकार्याच्या अभावामुळे कर्नाटकला त्रास सहन करावा लागतो.” आहे असा आरोप कुमारस्वामी यांनी केला आहे.