कोकणात कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन काम करत आह़े रुग्णसंख्या काहीशी कमी होत असल्याचे दिसत आह़े परंतु घटता दर कायमचा राहण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आह़े
कल्पना केली नसेल अशा महामारीशी सर्वजण झुंजताना अनेक प्रकारची काळजी घेतली जात आह़े माणसाच्या जीवनात मोठे बदल झाले आहेत़ कोविडोत्तर काळात यात आणखी बदल होण्याची शक्यता आह़े अनेक अडचणी व आव्हानांना तोंड देत माणूस उभा राहत आह़े कोकणात कोविडचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासन काम करत आह़े रूग्णसंख्या काहीशी कमी होत असल्याचे दिसत आह़े परंतु घटता दर कायमचा राहण्यासाठी सर्वंकष प्रयत्नांची गरज आह़े
रत्नागिरी जिह्यात आतापर्यंत 256 जण कोविडमुळे मृत्यूमुखी पडले तर 7 हजार 200 लोकांना आजवर बाधा झाल़ी गेला आठवडाभर रत्नागिरी जिह्यात बाधितांची संख्या दरदिवशी 100 च्या आत राहिली आह़े बऱया होणाऱया रूग्णांपेक्षा बाधितांची संख्या कमी असल्याचे दिसून आले आह़े अशा आकडेवारीमुळे कोविडचा वाढता आलेख खालावण्याची आशा निर्माण झाली आह़े
सिंधुदुर्ग जिल्हय़ात आतापर्यंत मृत्यू पावलेल्या लोकांची संख्या 85 एवढी आह़े तेथे 3 हजार 700 पेक्षा जास्त लोकांना लागण झाली आह़े सिंधुदुर्गात सुमारे 1,200 लोक कोविडवर उपचार घेत आहेत़ तेथे बाधित आणि रोगमुक्त झालेले लोक यांचा आकडा आसपासचा आह़े यामुळे तेथेही कोरोना मुक्तीच्या दिशेने प्रवासाची आशा जागली आह़े
रत्नागिरी जिह्यात कोविड रुग्णांसाठी सध्या ऑक्सिजनची कमतरता नसली तरी भविष्यात ती निर्माण होउढ नये म्हणून ती पावले उचलली जात आहेत़ जिल्हा रूग्णालयात ऑक्सिजन प्लँट उभारण्यासाठी प्रशासकीय मंजुरी प्राप्त झाली आह़े दरदिवशी 175 एवढे जंबो गॅस सिलेंडर भरले जातील यापूर्वी दर महिन्याला 150 ते 160 गॅस सिलेंडर लागत होत़े साथरोग काळात तो आकडा वाढल़ा प्रतिदिवशी जवळपास 175 सिलेंडर त्यासाठी लागत असल्याचे वैद्यकीय अधिकाऱयांचे म्हणणे आह़े गोव्याहून रत्नागिरीत ऑक्सिजनचा पुरवठा होत आह़े त्याला पर्याय म्हणून स्थानिक पातळीवर सिलेंडर भरण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येणार आह़े रत्नागिरीचा प्लँट महिनाभरात सुरू होईल, अशी अपेक्षा वैद्यकीय अधिकारी व्यक्त करत आहेत़
सिंधुदुर्ग जिह्यात सध्या दररोज 250 सिलेंडर लागतात़ तेथे ऑक्सिजन प्लँटची उभारणी सुरू आह़े आठवडाभरात तो कार्यरत होईल़ दिवसभरात 58 जंबो सिलेंडर भरण्याची तजवीज तेथे होणार आह़े त्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात आली आह़े यापूर्वी ऑक्सिजन सिलेंडर पुरवणाऱया खासगी उद्योगांना काही मर्यादा घालून देण्यात आल्या होत्य़ा 80 टक्के उत्पादन औद्योगिक वापरासाठी तर 20 टक्के उत्पादन वैद्यकिय वापरासाठी ठेवले जावेत असे ते निर्देश होत़े कोविड काळात वाढत्या ऑक्सिजन मागणीमुळे सरकारने हे प्रमाण बदलल़े आता 80 सिलेंडरच्या उत्पादनापैकी 80 टक्के हा भाग वैद्यकीय वापरासाठी तर 20 टक्के औद्योगिक उत्पादनासाठी राखीव ठेवावा, असे नवे निर्देश आहेत़ तथापि केवळ खासगी उत्पादकांवर अवलंबून राहण्याऐवजी शासकीय रूग्णालय परिसरात ऑक्सिजन प्लँटची निर्मिती करण्याचे राज्य सरकारने ठरवल़े त्याप्रमाणे आता उभारणी होत आह़े
78 टक्के कोरोना रूग्णांची वाढ
25 ऑगस्ट ते 24 सप्टेंबर दरम्यान रायगड जिह्यात 78 टक्के एवढय़ा प्रमाणात कोरोना रूग्णांची वाढ झाल़ी रत्नागिरी जिह्यात त्याच कालावधीत हे प्रमाण 124 टक्के एवढे होत़े तर सिंधुदुर्गात रूग्णवाढ 237 टक्के एवढी होत़ी याच कालावधीत रायगड जिह्यात मृत्यू दर 48 टक्के एवढा वाढल़ा रत्नागिरीत 163 टक्के वाढला तर सिंधुदुर्गात तो 331 टक्के एवढा वाढल़ा असल्याची आकडेवारी राज्य सरकारने दिली आह़े कोकणातील रूग्णवाढ ही चिंतेची गोष्ट असल्याचे राज्य सरकाने मान्य केले आह़े यावर उपाय म्हणून आरोग्य कर्मचारी घरोघरी भेट देत आहेत़ लोकांना जागृत करून तपासणीसाठी प्रवृत्त केले जात आह़े
कोरोनाशी संबंधित यंत्रणा उभारण्याचे काम प्रशासकीय अधिकारी करत आहेत़
ऑक्सिजनपासून अन्य साधन सामुग्री पुरेशा प्रमाणात मिळावी म्हणून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत़ तथापि शासकीय व्यवस्थेतून संशयित तपासणीसाठी व्यापक अभियान हाती घेतल्याचे दिसून येत नाह़ी
यापूर्वी आरटीपीआरच्या चाचण्या उपलब्ध होत्य़ा पण आता ताबडतोब निकाल मिळू शकणाऱया अँटीजन चाचण्या व्यापक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत़ त्यांचा वापर करून कोरोनाला पायबंद घालणे शक्य आह़े रत्नागिरी जिह्यात अँटीजन चाचण्या काही प्रमाणात वाढवल्या गेल्य़ा त्याचा परिणाम रूग्णवाढ दरावर झाल़ा सध्या रत्नागिरी जिह्यात नवे रूग्ण सापडण्याचे प्रमाण दरदिवशी 100 पेक्षा कमी राहिले आह़े ही दिलासादायक बाब असल्याचे मानण्यात येत़े गेल्या महिनाभरात व्यापारी, उद्योजक, वीज कर्मचारी, एसटी कर्मचारी यांच्यासाठी मोठय़ा प्रमाणात अँटीजन चाचण्या करण्यात आल्य़ा त्यामुळे रोगप्रसार होऊ शकेल अशा व्यक्ती तपासणीच्या कक्षेत आल्य़ा त्यातील बाधित व्यक्तींना वेगळे काढून उपचार सुरू झाल़े त्यामुळे प्रसाराला अटकाव झाल़ा
गेल्या महिनाभरात अँटीजन चाचण्यांचे यश समोर दिसत असतानाही सध्या या चाचण्यांचा व्यापक कार्यक्रम आरोग्य विभागाने हाती घेतल्याचे दिसून येत नाह़ी बाधित रूग्ण गेल्या 14 दिवसात ज्या लोकांशी संपर्कात आल़ा त्या सर्वांच्या चाचण्या केल्या जात आहेत़ असे म्हणणे धाडसाचे ठरेल़ रूग्णांचा इतिहास नोंदवून घेऊन संपर्काची शोध मोहीम घेतली जात असल्याबद्दल अनेक शंका आहेत़ अन्य ठिकाणांपेक्षा अधिक लवकर कोकणातील कोरोना नियंत्रणात येऊ शकत़ो त्यासाठी पुढच्या टप्प्यात तपासणी मोहीम राबवणे आवश्यक आह़े त्याकरिता योग्य व्यवस्थापन केले पाहिज़े
कोकणातील मृत्यूदर वाढीचा वेग चिंताजनक आह़े ज्या लोकांना कोरोनाची लागण झाल्याची संशय आह़े असे लोक उशिराने आरोग्य यंत्रणेकडे संपर्क साधतात़ त्यामुळे हे लोक काही प्रमाणात दुबळे झाले असतानाच रूग्णालयात दाखल होतात़ रूग्णाला संशय वाटताच त्याने कोरोना तपासणी करून घ्याव़ी लवकरात लवकर रूग्णालयात दाखल व्हावे असे सांगितले जात़े तथापि राज्यातील तुलनेत कोकणातील मृत्यूदर अधिक राहिल्याने त्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेणे गरजेचे आह़े
सुकांत चक्रदेव








