नवी दिल्ली
रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाढत्या तणावाचा परिणाम रुपयावर दिसून आला. आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया बुधवारी 49 पैसे इतका घसरुन 75.82 वर आला होता. कच्च्या तेलाच्या किंमतीत झालेली वाढ यामागचे कारण सांगितले जात आहे. विदेशी मुद्रा बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपया 75.78 वर खुला झाला होता. शेअर बाजारात निरुत्साह, गुंतवणूक काढण्यावर दिसणारा भर तसेच कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमतीच्या परिणामाने रुपया प्रभावीत झाला. दरम्यान रशियाचे चलन रुबलही 30 टक्के इतकी घसरण नोंदवत होते.









