अभिनेता अजय देवगण लवकरच अपकमिंग वेबसीरिज ‘रुद्र’सोबत ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सीरिजमधील अन्य कलाकारांविषयी आता माहिती समोर येऊ लागली आहे. या सीरिजमधून बॉलिवूडमधून जवळपास गायब झालेली ईशा देओल पुनरागमन करणार आहे. या सीरिजमध्ये ईशाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असणार आहे.
ईशा या सीरिजमध्ये अजय देवगणची पत्नी किंवा प्रेयसीची व्यक्तिरेखा साकारणार आहे. ईशा देखील याच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. रुद्र या वेब सीरिजमध्ये अजय देवगणसोबत काम करणार असल्याचे ईशाने ट्विट करत म्हटले आहे. या दोघांसमवेत या सीरिजमध्ये राशी खन्ना आणि हेमंत खेर देखील दिसून येणार आहेत. सीरिजचे चित्रिकरण चालू महिन्याच्या अखेरीस सुरू होणार आहे. या सीरिजची निर्मिती अप्लाउज एंटरटेनमेंटकडून केली जात आहे. हॉलिवूड अभिनेता इद्रिस अल्बाची हिट टीव्ही सीरिज ‘लूथर’चा हा हिंदी रिमेक असणार आहे.









