वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
चालू आर्थिक वर्षातील व्यवहारात रुचि सोया आणि पतंजली एकत्रितपणे 25 हजार कोटी रुपयाचा व्यापार करणार असल्याचे ध्येय कंपनीने निश्चित केल्याचा दावा योग गुरु बाबा रामदेव यांनी शुक्रवारी केला आहे. तर आगामी आर्थिक वर्षात देशातील एफएमजीसी क्षेत्रातील एक नंबरची कंपनी म्हणून उदयास येणार असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
रुची सोया चालू आर्थिक वर्षात 12 हजार कोटी आणि पतंजली 13 हजार कोटी रुपयाची उलाढाल करणार असल्याचे अनुमान बाबा रामदेव यांनी एका संमेलनाच्या कार्यक्रमात बोलताना सांगितले आहे. तर याच कंपन्या आगामी एक वर्षापर्यंत 30 ते 40 हजार कोटी रुपयाचा व्यापार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
सरकारचा हस्तक्षेप न करता कंपनीने अधिग्रहण केले आहे. तर सध्या युनिलिव्हर कंपनी आतापर्यंत एफएमजीसी क्षेत्राता नंबर एक कंपनी राहिली आहे. परंतु येत्या वर्षात त्यांची जागा आपली कंपनीच घेणार असल्याचा विश्वास कंपनीचे संस्थापक योग गुरु बाबा रामदेव यांनी व्यक्त केला आहे.
पाच वर्षात पाच पट वृद्धीचे ध्येय
आगामी पाच वर्षात रुचि सोयाचा व्यापार तीनहून पाच पट करण्याचे ध्येय
कंपनीने निश्चित केले आहे. यामध्ये सोयाबीनपासून निर्मिती केलेली न्यूट्रीलाचे तीन नवी उत्पादने बाजारात लवकरच उतरणार आहे. ही उत्पादने हृदयरोग आणि कोलेस्ट्रोल यावर उपचार करणारे असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.








