नवी दिल्ली
रुची सोया इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये बुधवारच्या सत्रात सुरुवातीला जवळपास 19 टक्क्यांची घसरण राहिली. मात्र काही वेळानंतर यामध्ये सुधारणात्मक स्थिती राहिली होती. रुची सोयाच्या 4,300 कोटी रुपयाच्या एफपीओच्या घोषणेनंतर काही मुद्यांसह नियामककडून कडक नियमावर बोट ठेवल्याने समभागात घसरण राहिल्याची नेंद करण्यात आली आहे.
भांडवली बाजारातील नियमाक सेबीने पतंजली समूहाची कंपनी रुची सोयाच्या बँकरला एफपीओच्या दरम्यान समभागांची विक्री करण्यासाठी चुकीच्या पद्धतीचा अवलंब होत असल्याची माहिती एसएमएसच्या माध्यमातून देऊन सतर्क केल्यामुळे गुंतवणूकदारांना आपली बोली परत घेण्याचा पर्याय मिळाला होता. मात्र यामुळे गोंधळ निर्माण होऊन बाजारात नकारात्मक स्थिती राहिल्याने समभाग घसरले होते. मात्र बुधवारच्या सत्रात दुपारपर्यंत सदरची नुकसान झालेली
स्थिती सुधारत गेली. रुची सोयाचे समभाग हे जवळपास 9 टक्क्यांनी घसरुन 797.50 वर पोहोचले होते.









