प्रतिनिधी / बार्शी
बार्शी येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कर्मवीर डॉक्टर जगदाळे मामा हॉस्पिटल या ठिकाणी असणाऱ्या डेडिकेटेड कोबी हॉस्पिटलला काम करणारा कर्मचारी कोरोना बाधित होऊ आज मयत झाला होता हा कर्मचारी मयत झाल्याने त्या कर्मचाऱ्यास त्याच्या उपचाराचे पैसे मागितले किंवा या डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये कर्मचाऱ्यांसाठी कोणत्याही सुरक्षा साधने नाहीत यामुळे येथील नर्सिंग स्टाफ सह कर्मचाऱ्यांनी आज काम बंद आंदोलन करून दवाखान्याच्या गेटवर ठिय्या मारलेला होता. कोरोनाच्या काळामध्ये कर्मचाऱ्यांनाच आपल्या सुरक्षेची साधने मिळण्यासाठी आंदोलन करावे लागत आहे. हे नक्कीच बार्शीच्या आरोग्य क्षेत्रासाठी भूषणावह नाही हे आंदोलन कॉम्रेड तानाजी ठोंबरे यांच्या नेतृत्वात पार पडले.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, जगदाळेमामा रुग्णालयातील कर्मचारी तानाजी घोरपडे (वय 55) यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यांना मधुमेह, रक्तदाबाचा त्रास होत असताना त्यांना प्रशासनाने कामावर बोलावले. त्यांची कोविड वॉर्डमध्ये नेमणूक केली. प्रशासनाने त्यांचा औषध उपचाराचा खर्च मागितला. याच्या निषेधार्थ सर्व कामगार एकत्र येऊन प्रशासनाच्या विरोधात बंद पुकारला होता.
तसेच यावेळी जगदाळेमामा रुग्णालयात सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना आजारी पडले तर रुग्णालय बिल आकारते, कर्मचाऱ्यांचा विमा रुग्णालयाने काढलेला नाही, निकृष्ट दर्जाचे जेवण कर्मचाऱ्यांना दिले जाते, कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन केले जात नाही, कर्मचाऱ्यांच्या अडचणी प्रशासन ऐकून घेत नाही, मेट्रन माणुसकीने वागत नाहीत, उच्च दर्जाचे पीपीई किट नाहीत, अतिदक्षता विभागात कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. बारा तास काम करून घेतले जाते, एका वॉर्डमध्ये 50 पेक्षा जास्त रुग्णांकडे लक्ष द्यावे लागते, रजा दिली जात नाही. यासह अन्य मागण्यांसाठी कर्मचारी शनिवारी सकाळी गेटवर ठिय्या मांडून बसले होते.
यावेळी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. बी. वाय. यादव, कामगार नेते तानाजी ठोंबरे, शिवसेनेचे भाऊसाहेब आंधळकर यांनी घटनास्थळी भेट देऊन कामगारांची विचारपूस केली.
या वेळी पाच कामगारांची कमिटी नेमू, संस्था याबद्दल लेखी मान्यता सायंकाळपर्यंत देईल, असे तानाजी ठोंबरे यांनी स्पष्ट केले. त्यानंतर सर्व कर्मचारी कामावर गेले. या वेळी डॉ. यादव म्हणाले, मृत तानाजी घोरपडे यांचा सर्व खर्च संस्था देईल. आरोग्यमंत्री, जिल्हाधिकारी, पालकमंत्री यांच्याकडे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या विमाचा प्रश्न मांडला आहे, त्याचा पाठपुरावा सुरू आहे. मी वैयक्तिक एक लाख रुपये घोरपडे कुटुंबाला देत असून, शासनाकडून मदत मिळवण्यासाठी संस्था प्रयत्न करेल.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









