अचूक बातमी “तरुण भारतची”, शुक्रवार 8 एप्रिल 2022, सकाळी 11.15
● जिल्ह्यातील रूग्णालयातील कोरोना वार्ड मोकळे
● गृहविलीगीकरणात फक्त 11 रूग्ण
● सातारा 2 तर पाटण, खंडाळा प्रत्येकी 1 रूग्ण
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख शुन्यावर आला असून सध्याच्या स्थितीत जिल्ह्यातील 11 रूग्ण गृहविलिगीकरणात उपचार घेत आहेत. जिल्ह्यात शासकीय रूग्णालयांसह खासगी रूग्णालयातील कोरोना वार्ड मोकळे झाले असून आरोग्य यंत्रणेवरील ताणही कमी झाला आहे. दरम्यान शुक्रवारी सकाळी आलेल्या अहवालात 300 संशयितांच्या चाचण्या झाल्या असून 4 रूग्ण कोरोना बाधित आढळले आहेत.
गृहविलिगीकरणातच उपचार
कोरोना रूग्णसंख्या वाढीचा आलेख पाचच्या खालीच असून सर्वच सक्रिय रूग्ण गृहविलिगीकरणात उपचार घेत आहेत. गृहविलिगीकरणात उपचार घेत असलेल्या रूग्णांवर स्थानिक आरोग्य विभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. रूग्णसंख्या कमी झाली असली तरीही आरोग्य विभागाने टप्प्याने लसीकरण व चाचण्यांची संख्या कायम ठेवली आहे.
आरोग्य विभागावरील ताण कमी
गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या गडद संकटाने वैद्यकीय आरोग्य व्यवस्थेवरील ताण प्रचंड वाढला होता. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य सेविका, आशा सोविका यांचे कामाचे तासही वाढले होते. मात्र मार्च महिन्यात हा ताण पुरता हलका झाला आहे. रूग्णसेवेचा ताण हलका झाला असला तरी लसीकरणाचे काम अजुनही वेगाने सुरू आहे.
शुक्रवारी
नमुने-300
बाधित-4
शुक्रवारपर्यंत
नमुने-25,73,290
बाधित-2,79,208
मृत्यू-6,683
मुक्त-2,71,818