रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी केली सूचना,
प्रतिनिधी/बेळगाव
रुग्णांना हॉस्पिटलमध्ये नेणाऱया रुग्णवाहिकांची (ऍम्ब्युलन्स) बॅरिकेड्समुळे गैरसोय होत आहे. याकडे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने ट्विटच्या माध्यमातून राज्याच्या अतिरिक्त पोलीस महासंचालकांचे लक्ष वेधले आणि त्यांनी तातडीने याची दखल घेवून काही ठिकाणी बॅरिकेड्स हटविले. या शिवाय रुग्णसेवा व अन्य तातडीच्या सेवांसाठी मार्ग खुला करुन देण्याची ग्वाही दिली.
गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने सर्वत्र बॅरिकेड्सने रस्ते बंद केले आहेत. काही ठिकाणी लोखंडी बॅरिकेड्स बोल्ट लावून जाम बसवले आहेत. त्यामुळे ते हलवता येत नाहीत. परंतु याचा फटका रुग्णवाहिकांना व रुग्णांना बसत आहे. त्यामुळे रुग्णवाहिकांना सहज ये-जा करता यावी या दृष्टीने बॅरिकेड्स उभे करावेत अशी मागणी होत आहे.
स्टेशनरोडवर रेल्वे ओव्हरब्रिजनजीक रस्ता बंद करण्यात आला आहे. त्यामुळे खानापूर रोड, ओव्हरब्रिजच्या जवळपास असणाऱया हॉस्पिटल्समधून रुग्णांना घेऊन जाणे व प्रामुख्याने दाखल करणे यामध्ये व्यत्यय निर्माण होत आहे. हीच परिस्थिती अन्य ठिकाणी असणाऱया हॉस्पिटल्सबाबतीतही आहे. पोलिसांनी वरि÷ांना कळवून त्यांनी परवानगी दिल्यानंतर बॅरिकेड्स हटवण्यात वेळ जातो. परिणामी रुग्णांना उपचार मिळण्यातही वेळ होतो.
याबाबत युवा समितीने राज्याचे अतिरिक्त महासंचालक भास्करराव यांना कळविले होते. त्यांनी बॅरिकेड्स हटविण्याबाबत पोलीस आयुक्तांना सूचना केल्या होत्या. परंतु त्याची कार्यवाही झाली नाही. त्यामुळे समितीने पुन्हा महासंचालकांचे लक्ष या समस्येकडे वेधले.
शहरात ठिकठिकाणी बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पिवळय़ा रंगाचे लहान बॅरिकेड्स सहज हलवता येतात. परंतु बोल्ट लावून जाम केलेले बॅरिकेड्स हलवणे शक्मय नसते. त्यामुळे रुग्णवाहिकांना वळसा घालून जावे लागते. ही बाब पोलीस महासंचालकांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी रुग्णवाहिकांची अडचण होऊ नये यासाठी बॅरिकेड्सचा नियम शिथील केला जाईल अशी ग्वाही दिली. तसेच स्थानिक अधिकाऱयांनीसुद्धा रुग्णवाहिकांसाठी मार्ग खुला करण्याचे मान्य केले आहे.









