ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णवाढीचा वेग दिवसेंदिवस वाढत असून, मागील चार दिवस एक लाखांच्या वर असणारी दैनंदिन रुग्णसंख्या आज 1.45 लाखांवर पोहचली आहे. कोरोनाकाळातील ही नवी उच्चांकी रुग्णवाढ आहे. दरम्यान, मागील 24 तासात 1 लाख 45 हजार 384 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 794 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 32 लाख 05 हजार 926 वर पोहचली असून, मृतांची एकूण संख्या 1 लाख 68 हजार 436 एवढी आहे.
शुक्रवारी 77,567 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 1 कोटी 19 लाख 90 हजार 859 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. सध्या 10 लाख 46 हजार 631 ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील 9 कोटी 80 लाख 75 हजार 160 जणांना लसीकरण करण्यात आले.
देशात आतापर्यंत 25 कोटी 52 लाख 14 हजार 803 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यामधील 11 लाख 73 हजार 219 कोरोना चाचण्या शुक्रवारी (दि.09) करण्यात आल्या.









