प्रतिनिधी/ बेळगाव
रुक्मिणीनगर येथील एका जुगारी अड्डय़ावर छापा टाकून पोलिसांनी 8 जुगाऱयांना अटक केली. माळमारुती पोलिसांनी ही कारवाई केली. त्यांच्या जवळून 25 हजार 670 रुपये रोकड व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
रुक्मिणीनगर परिसरात अंदर-बाहर जुगार सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी अचानक छापा टाकून 8 जुगाऱयांना अटक केली. त्यांच्यावर कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे.









