कोडगू /प्रतिनिधी
राज्यात कोरोनाचा वाढत धोका लक्षत घेऊन , कोडगू (कुर्ग) जिल्हा प्रशासनाने रिसॉर्ट्स, हॉटेल्स आणि अथाति गृह बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाचा पुढील आदेश येईपर्यंत त्यांचे व्यवसाय बंद ठेवण्यास सांगितले आहे.
कोडगूचे उपायुक्त अॅनी कानमनी जॉय यांनी आदेशात म्हटले आहे की, सर्व रिसॉर्ट्स, हॉटेल्स, सर्व्हिस अपार्टमेंट्स, निवासी वसतिगृहे आणि होमस्टेज यांनी जिल्ह्याबाहेरील रहिवाशांना राहण्यासाठी जागा देऊ नये. यात बाहेरून येणाऱ्या व्यापारी आणि पर्यटकांचा समावेश आहे. “जे लोक आधीच निवासस्थानी दाखल झाले आहेत त्यांना जबरदस्तीने रिकामे केले जाऊ नये आणि त्यांना बुकिंगच्या तारखेपर्यंत मुक्काम करू द्या. परंतु त्यांच्या तारखा वाढविल्या जाऊ नयेत. ज्या पाहुण्यांनी निवासस्थानाचे आरक्षण केले आहे आणि ते आलेले नाहीत अशा अतिथींचे आरक्षण रद्द करण्यास सांगितले जाईल असे म्हंटले आहे. आहे.
यापूर्वी जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह घटनांमध्ये वाढ होऊनही रिसॉर्ट्स आणि होमस्टेस बंद न केल्याबद्दल कोडगु येथील रहिवाशांनी जिल्हा प्रशासनावर टीका केली होती. लॉकडाउन उठविल्यानंतर आणि आंतरजिल्हा सीमा निर्बंध शिथिल केल्याने पर्यटकांचा ओघ वाढला होता. कोडगुमध्ये कोरोनाचे 82 रुग्ण आढळले असून एकाचा मृत्य झाल्याची नोंद आहे. जिल्ह्यात 36 कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहेत.









