3 हजार 675 कोटींची गुंतवणूक :0.84 टक्के हिस्सेदारी घेणार
वृत्तसंस्था / मुंबई
प्रायव्हेट इक्विटी फर्म जनरल अटलांटिक पार्टनर्सने रिलायन्स रिटेलमध्ये 3,675 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या गुंतवणुकीसोबत रिलायन्स रिटेलमधील जवळपास 0.84 टक्क्मयांची हिस्सेदारी जनरल अटलांटिक आपल्याकडे घेणार आहे. रिलायन्स रिटेलमध्ये ही तिसऱया नंबरची गूंतवणूक आहे. ही गुंतवणूक 4.28 लाख कोटी रुपयांच्या इक्विटी मूल्यावर करण्यात येणार आहे, अशी माहिती रिलायन्स इंडस्ट्रीजने शेअर बाजाराला दिलेली आहे. अटलांटिकने या अगोदर जिओ प्लॅटफॉर्ममध्ये 6,598 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.
दुसऱया बाजूला अबुधाबीची मुबादला इन्वेस्टमेंटनेही 7,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना बनविली आहे. यामध्ये जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली आहे. साधारणपणे आजच्या व्यवहारासोबत मिळून एकूण तीन कंपन्यांनी रिलायन्स रिटेलमध्ये गुंतवणूक केली आहे. पहिल्या दोन गुंतवणूकदारांनी 4.21 लाख कोटी रुपयांच्या मूल्याची हिस्सेदारी घेतली आहे. तर अटलांटिकला 4.28 लाख कोटी रुपयांची हिस्सेदारी मिळणार आहे.