5 हजार 500 कोटींची गुंतवणूक : लहान व्यापाऱयांचे जाळे उभारणार
मुंबई : मागील काही दिवसांपासून गुंतवणूक आणि रिलायन्स यांचे समीकरण मजबूत होत असल्याचे बाजारात पहावयास मिळत आहे. याचाच भाग म्हणून रिलायन्स जिओपाठोपाठ आता रिलायन्स रिटेलच्या प्लॅटफॉर्ममध्ये खासगी इक्विटी कंपनी केकेआर जवळपास 5,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
केकेआरला रिलायन्स रिटेलमध्ये 1.28 टक्क्मयांचे इक्विटी समभाग मिळणार आहेत. तसेच रिलायन्स रिटेलमध्ये दोन कंपन्यांची मिळून एकूण गुंतवणूक आता 13 हजार कोटी रुपयांच्या घरात पोहोचणार असल्याची नोंद केली आहे. साधारणपणे यामध्ये गुंतवणूक करणारी ही दुसऱया नंबरची कंपनी आहे. तसेच जगातील दिग्गज टेक इन्वेस्टर कंपनी सिल्वर लेकने याआधी रिलायन्स रिटेलमध्ये 7500 कोटी रुपये गुंतवण्याचा निर्णय घेतला आहे.
केकेआरची जिओमध्येही गुंतवणूक
केकेआर कंपनीची रिलायन्स इंडस्ट्रीज समूहातील दुसरी गुंतवणूक असणार आहे. तसेच या अगोदर याच कंपनीने जिओ प्लॅटफॉर्ममध्ये गुंतवणूक केली होती. तसेच दोन्ही गुंतवणुकीचा मिळून एकत्रित आकडा हा 11,367 कोटींवर राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.