वृत्तसंस्था/ मुंबई
रिलायन्स इंडस्ट्रीजचा लवकरच 53,124 कोटी रुपयांचा राईट इश्यू बंद होणार आहे. त्याच्या अगोदर दोन दिवस सोमवारी 1.1 पटीने गुंतवणूकदारांनी सदस्यत्व घेतलेले आहे. यामुळे रिलायन्सच्या राईट इश्यूसाठी एकूण 46.04 कोटी समभागांसाठी बोली प्राप्त झाल्या आहेत. 42.26 कोटी समभागाच्या तुलनेत ऑफरचा आकार 8.9 टक्के जादा राहिला आहे.
येत्या दिवसांमध्ये सदस्यत्व मिळवण्याचा वेग दुप्पट होणार असल्याचे म्हटले आहे. त्याच्यानंतर हा राईट इश्यू बंद होणार आहे. प्रामुख्याने संस्थात्मक गुंतवणूक ही शेवटच्या दिवशी केली जाते.
कर्ज कमी करण्यावर भर
राईट इश्यूच्या आधारे जोडण्यात येणाऱया निधीचा 75 टक्के वापर रिलायन्समधील कर्ज कमी करण्यासाठी होणार आहे. कायदेशीर व अन्य खर्च बाजूला करुन कंपनीला या राईट इश्यूच्या आधारे 53,036.13 कोटी रुपयांचा फंड मिळणार असल्याचा अंदाज आहे.









