सेन्सेक्स 743 अंकांनी तेजीत : रिलायन्स 10 टक्क्मयांनी तेजीत
वृत्तसंस्था / मुंबई
मागील काही दिवसांपासून उद्योग क्षेत्रातून कोणत्याही प्रकारच्या व्यवहार किंवा अन्य प्रकारच्या वेगळय़ा घडामोडींच्या बातम्या पहावयास मिळाल्या नव्हत्या. परंतु उद्योग जगताला आश्वर्यचकीत करणारी गोष्ट बुधवारी घडली. ती म्हणजे फेसबुक आणि रिलायन्स जिओ यांच्यात झालेला व्यवहार. फेसबुक रिलायन्समध्ये 43,574 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामुळे 9.99 टक्के हिस्सेदारी फेसबुकची रिलायन्समध्ये राहणार आहे. तसेच देशासह जागतिक पातळीवर डिजिटल क्रांतीच्या नव्या दिशेने हे पाऊल पडणार असल्याचे तज्ञांचे मत आहे.
सदरच्या घडामोडीचा परिणाम मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्सच्या कामगिरीवर बुधवारी पडल्याचे पहावयास मिळाले. दिवसअखेर बीएसई सेन्सेक्स 742.84 अंकांनी वधारुन निर्देशांक 31,379.55 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 205.85 अंकानी वधारुन निर्देशांक 9,187.30 वर बंद झाला आहे. याचदरम्यान जागतिक बाजारात सकारात्मक वातावरण पाहावयास मिळाल्याने रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तब्बल 10 टक्क्मयांनी वधारले होते. एकटय़ा रिलयान्सच्या कामगिरीमुळे जवळपास 350 अंकांनी सेन्सेक्समध्ये तेजीचे वातावरण राहिले
आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमतीत ऐतिहासिक घसरण झाल्यामुळे सेक्सेक्सची मोठय़ा प्रमाणात पडझड झाल्याचे पहावयास मिळाले होते. यामुळे बाजारातील गुंतवणूकदारांचे कोटय़वधी रुपयाचे नुकसान झाल्याचे दिसून आले. त्यामुळे बुधवारीही तेलदर घसरणीचा दबाव बाजारात राहण्याचे संकेत होते. परंतु रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्या ऐतिहासिक व्यवहारामुळे ही संपूर्ण चिंता तेजीच्या उसळीमध्ये बदलून टाकण्यात बाजाराला यश मिळाले असल्याचे शेअर बाजारातील तज्ञांनी म्हटले आहे. .
दिग्गज कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, एशियन पेन्ट्स, नेस्ले इंडिया, मारुती सुझुकी, हिरोमोटो कॉर्प आणि हिंदुस्थान युनिलिव्हर यांचे समभाग तेजीत राहिले. तर दुसऱया बाजूला ओएनजीसी, लार्सन ऍण्ड टुब्रो, पॉवर ग्रिड कॉर्प यांचे समभाग मात्र घसरले आहेत.









