ऑनलाईन टीम / मुंबई :
रिलायन्स एंटरटेनमेंट ग्रुपचे सीईओ शिबासिस सरकार यांना कोरोनाची बाधा झाली असल्याची बातमी समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शिबसिस सरकार यांना शनिवारी ताप आल्याने त्यांना मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले त्यांनतर त्याची कोरोनाची टेस्ट केली असता त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, आज त्यांचा ताप उतरला असून अजूनही ते रुग्णालयातच आहेत.
मला कोरोनाची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या माझी प्रकृती स्थिर असून माझ्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरू आहेत. लवकर बरा होऊन काम सुरू करेन, अशा भावना शीबसिस सरकार यांनी यावेळी व्यक्त केल्या.
दरम्यान, याआधी कला क्षेत्रातील लोकप्रिय गायिका कानिका कपूर तसेच निर्माता करण जोहर, बोनी कपूर यांच्या घरातील नोकरांना देखील कोरोनाची बाधा झाली होती. त्यातच संगीतकार वाजिद खान यांचे देखील आज कोरोनामुळे निधन झाले आहे.









