ग्रीन एनर्जी, इंटिग्रेटेड 5जी सोल्यूशन्स आदींची नवी योजना
मुंबई
देशातील सर्वात मोठी कंपनी म्हणून ओळख असणारी रिलायन्स इंडस्ट्रीज लि.(आरआयएल) आता पुन्हा एकदा काही सेगमेंटची पुनर्रचना करण्याची योजना बनवत आहे. यामध्ये ग्रीन एनर्जी-टिकाऊ मटेरियल, इंटिग्रेटेड5जी सोल्यूशन्स, न्यू कॉमर्स आदी संदर्भात रिलायन्स पुनर्रचना करण्याचे संकेत आहेत. सोबत देशात गॅस उत्पादन वाढविण्यावरही भर देत असल्याची माहिती आहे.
खालील निवडक बदल होण्याचा अंदाज
ऑईल ते केमिकल व्यवसाय
रिलायन्सने अगोदरच ऑईल ते केमिकल व्यवसायाची पुनर्रचना केली आहे. यामध्ये रिटेल ऑपरेशनला पुन्हा वेगळे केले आहे. यात दूरसंचार क्षेत्राकरीता महत्त्वाची मानली जाणारी 5 जी सेवा दुप्पट वेगाने पुढे नेण्याची योजना आखण्यात येणार असल्याची माहिती आहे.
समभाग घसरण थांबविण्याचा प्रयत्न
रिलायन्स आता अशा एका योजनेवर काम करत आहे,की कंपनीच्या समभागात घसरण आल्यास ती सावरण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती आहे. यामध्ये नवीन उत्पादन आणि एनर्जी व्यवसायात हिस्सेदारीची संभावित विक्रीची योजनाही कंपनीने सविस्तरपणे आखली आहे.
1.92 लाख कोटी रक्कम उभारली
रिलायन्सने जिओ आणि रिटेलमधील हिस्सेदारी विकून 1.92 लाख कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम कोरोना कालावधीत जमा केली आहे. यामध्ये सर्व विदेशी गुंतवणूकदारांचा समावेश आहे.









