वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
रिलायन्स इंडस्ट्रीज ही देशातील दिग्गज कंपनी म्हणून ओळखली जाते. सदर कंपनीने मागील चार महिन्यापासून उद्योगक्षेत्राला आश्चर्याचे धक्के दिले आहेत. यामध्ये कर्जमुक्त रिलायन्स, जिओमधील 14 गुंतवणूकदारांची गुंतवणूक, समभागातील उच्चांकी प्रवास आणि अंबानींची श्रीमंतांमध्ये पाचव्या स्थानी झेप आदींचा उल्लेख करता येईल. आता तब्बल 14 लाख कोटी रुपयांच्या बाजारमूल्यावर घेतलेली झेप चर्चिली जात आहे. शुक्रवारी कंपनीचे समभाग चार टक्क्मयांच्या तेजीने वधारुन आपला सर्वोच्च टप्पा पार केला आहे. या विक्रमासोबत रिलायन्सचे सद्यस्थितीमधील भांडवल 14,07,854.41 कोटींच्या घरात पोहोचले आहे. देशातील सर्वात मूल्यवान कंपनीचे समभाग 4.32 टक्क्मयांनी वधारुन 2,149.70 रुपयांवर पोहोचले आहेत. या मूल्याच्या स्पर्धेत दुसऱया स्थानी टीसीएस असल्याची माहिती आहे.









