नवी दिल्ली
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनंतर रिलायन्स इंडस्ट्रिजची वार्षिक सर्वसाधारण बैठक 15 जुलैला आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होणार असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.
कोरोनामुळे खुली सभा घेण्यास मनाई असल्यामुळे सदरची 43 वी वार्षिक सर्वसाधारण सभा व्हिडिओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातून होणार आहे. या आधी टीसीएचची 11 जूनला वार्षिक सर्वसाधारण सभा अशाच पद्धतीने पार पडली होती. आतापर्यंत रिलायन्स आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभा मोठय़ा स्टेडियममध्ये घेत होती.









