ऑनलाईन टीम / मुंबई :
दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातल्या ड्रग्ज कनेक्शनमुळे अटकेत असलेली अभिनेत्री रिया चक्रवर्तीच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसत आहे. रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविकचा जामीन अर्ज आज न्यायालयाने फेटाळला आहे. कोणतेही कारण न देता न्यायालयाने तिचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या दोघांसह इतर सहा जणांचे जामीन अर्ज देखील फेटाळण्यात आले आहेत.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यामुळे रिया आणि इतरांचा तुरुंगातील मुक्काम वाढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. शिवाय सत्र न्यायालयाने रियाचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे ती आता हाय कोर्टात धाव घेणार आहे.
दरम्यान, रियाचे वकील सतीश माने शिंदे यांनी कोर्टाच्या निकालाची प्रत हाती आल्यानंतर सांगितले की, आम्ही पुढच्या आठवड्यात हाय कोर्टात जाण्याबाबत निर्णय घेऊ.
यापूर्वी मंगळवारी रियाला अटक केली आणि त्याच दिवशी न्यायालयाने 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.