वृत्तसंस्था/ माद्रीद
रियल माद्रीद फुटबॉल क्लबचा बचावफळीत खेळणारा फुटबॉलपटू इडेरह मिलीटो याला कोरोना बाधा झाल्याचे सांगण्यात आले. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील रियल माद्रीद आणि इंटर मिलान यांच्यात आगामी सामना खेळविला जाणार आहे.
रविवारी सकाळी इडेर मिलीटोची केरोना चांचणी घेण्यात आली. रियल माद्रीद संघातील सर्व फुटबॉलपटूंची तसेच प्रशिक्षक वर्गाची कोरोना चांचणी सक्तीची करण्यात आली होती. बऱयाच फुटबॉलपटूंची चांचणी घेण्यात आली आणि काहीजण निगेटिव्ह असल्याचे आढळून आले. चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धच्या गुणतक्त्यात ब गटात रियल माद्रीद शेवटच्या स्थानावर आहेत. मंगळवारी रियल माद्रीदचा सामना इंटर मिलान संघाशी होणार आहे. कोराना बाधित मिलीटोला आता काही दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये राहावे लागणार आहे.









