जवळपास 33,800 कोटी रुपयांची गुंतवणूक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
अगोदरच मंदीच्या झळा झेलणाऱया भारतीय रियल इस्टेट क्षेत्रात मागील आर्थिक वर्षामध्ये संस्थात्मक गुंतवणूक कमी राहिली आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये भारतामधील रियल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणूक 12 टक्क्मयांनी घटून 4.48 अब्ज डॉलर म्हणजे जवळपास 33,800 कोटी रुपयांवर राहिली असल्याची माहिती अमेरिकेच्या प्रॉपर्टी कंसल्टंट फर्म वेस्टियनच्या अहवालामधून देण्यात आली आहे.
सदरची गुंतवणुकीमधील घसरण ही प्रामुख्याने मंदावलेली आर्थिक गती आणि कोरोनाच्या महामारीच्या वातावरणामुळे निर्माण झाली असल्याचे संकेत व्यक्त केले आहेत. मागील आर्थिक वर्षातील चौथ्या तिमाहीमधील रियल इस्टेट क्षेत्रातील संस्थात्मक गुंतवणूक 44 टक्क्मयांनी घसरली आहे. यामध्ये केवळ 5490 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मागील आर्थिक वर्षात 2019-20 मध्ये मागील पाच वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक कमी संस्थात्मक गुंतवणूक राहिली आहे.
व्यावसायिक असेट्समध्ये 81 टक्के गुंतवणूक
एकूण गुंतवणुकीत व्यावसायिक सेगमेंटमध्ये 81 टक्क्मयांची गुंतवणूक राहिली आहे. म्हणजे जवळपास 3636 दशलक्ष डॉलर इतकी गुंतवणूक प्राप्त झाली आहे. या प्रकारे रेजिडान्शियल सेगमेंटमध्ये 13 टक्क्मयांनी 565 दशलक्ष संस्थात्मक गुंतवणूक राहिली आहे.
महत्वाच्या शहरांचा समावेश
गुंतवणुकीमधील शहरांचा समावेश पाहिल्यास यामध्ये मुंबई, बेंगळूर आणि पूणे या शहरांमध्ये एकूण गुंतवणुकीत जवळपास 90 टक्केचा वाटा राहिला आहे. यामध्ये मुंबईचा 42 टक्के आणि बेंगळूरचा 37 टक्क्मयांचा वाटा आहे.









