नवी दिल्ली / वृत्तसंस्था
रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. गेल्या काही दिवसांमध्ये माझ्या संपर्कात आलेल्या लोकांनीही कोरोना तपासणी करून घ्यावी असा सल्लाही त्यांनी दिला आहे. कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नसली तरी आपला अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. सध्या माझी प्रकृती उत्तम आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. प्रकृती ठिकठाक असल्यामुळे घरी आयसोलेशनमध्ये राहून ते आपले काम सुरुच ठेवणार आहेत.









