नवी दिल्ली
स्मार्ट फोन क्षेत्रात कार्यरत चिनी कंपनी रिअलमी आगामी काळात भारतात 7 हजार 500 जणांना रोजगार मिळवून देणार आहे. आपल्या विविध उत्पादनांच्या कार्यासाठी नव्याने भरती केलेल्यांची निवड केली जाणार आहे. कंपनी आपल्या अगामी येऊ घातलेल्या उत्पादनांसाठी सदरची कर्मचारी भरती करणार आहे. स्मार्ट टूथब्रश, स्विपिंग मशीन व स्मार्ट लॉक्स अशी उत्पादने रिअलमी भारतात उतरवणार आहे.









