-जयवंतराव शिंपी उपाध्यक्ष
-महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली घोषणा -निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजप आघाडीचा निर्णय
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी अखेर आमदार पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल पाटील व उपाध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादीचे जयवंतराव शिंपी यांचे नाव निश्चित झाले. सोमवारी सकाळी ११ वाजता पालकमंत्री सतेज पाटील ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शासकीय विश्रामगृहामध्ये या दोघांच्या नावांची घोषणा केली. यावेळी आमदार पी . एन.पाटील , राजेश पाटील , राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
जिल्हा परिषदेमध्ये दुपारी एक वाजता ही निवडणूक प्रक्रिया होणार असली तरी ही निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजप आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यामुळे राहुल पाटील आणि जयवंतराव शिंपी यांची निवड बिनविरोध होणार आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









