राज्यात काँग्रेस सरकार सत्तेवर येण्यासाठी घातले गणरायाला साकडे : देवस्थान समितीतर्फे गांधी यांचा सत्कार
डिचोली/प्रतिनिधी
काल शुक्र. दि. 4 फेब्रु. रोजी साखळीत काँग्रेस पक्षाच्या निर्धार सभेसाठी साखळीत आलेल्या काँग्रेसचे राष्ट्रीय जे÷ नेते राहुल गांधी यांनी सभेला जाण्यापूर्वी देसाईनगर येथील श्री सिध्दीविनायक मंदिरात भेट देऊन सिध्दीविनायकाचे दर्शन घेतले. गोव्यात यावेळी निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन व्हावे असे साकडे यावेळी गांधी यांनी गणरायाकडे घातले.
यावेळी त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, साखळीचे उमेदवार धर्मेश सगलानी, प्रभारी दिनेश गुंडूराव, युवा अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, प्रवीण ब्लेगन, सुबोध आमोणकर, गौतम भगत व इतरांची उपस्थिती होती. तसेच श्री सिध्दीविनायक देवस्थान समितीचे अध्यक्ष अशोकराव देसाई, उपाध्यक्ष श्रीकांत मळीक, सचिव सुरज नाईक, सहसचिव सिध्देश साळु?खे, खजिनदार योगेश लवंदे, उपखजिनदार व्यंकटेश देसाई, सदस्य महेश देसाई, गौरव देसाई, सदाशिव गावस, संदेश गोवेकर, मंगलदास नाईक, विराज एकावडे व इतरांचीही यावेळी उपस्थिती होती.
साखळीत सभेला उपस्थिती लावण्यापूर्वी राहुल गांधी यां?नी अचानक देसाईनगर येथील सिध्दीविनायक मंदिराला भेट दिली. यावेळी देवस्थान समितीतर्फे गांधी यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. गांधी यांनी समितीच्या सदस्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.









