वृत्तसंस्था/ सिंगरौली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी मध्यप्रदेशच्या सिंगरौलीमध्ये बोलताना राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. देशात द्वेषाला कोण जन्म देतोय अशी विचारणा राहुल गांधींना करू इच्छित आहे. भारत जोडो यात्रेत देशात द्वेष पसरला असल्याचे म्हणत राहुल गांधी हेच भारताला बदनाम करत असल्याचा आरोप राजनाथ सिंह यांनी केला आहे. मोदी सरकारने देशाला विकासाच्या मार्गावर नेण्याचे काम केले आहे. पूर्वी आम्ही लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रs, युद्धनौका आणि बॉम्बसमवेत अन्य सामग्री अन्य देशांमधून आयात करत होतो. परंतु आता आम्ही भारतातच सर्वकाही तयार करविण्याचे कार्य केले आहे. भारत आता संरक्षण सामग्रीची निर्यात करणारा देश ठरला असल्याचे उद्गार संरक्षणमंत्र्यांनी काढले आहेत. सिंगरौली येथील भूमीवाटप कार्यक्रमात बोलताना राजनाथ यांनी मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांचे कौतुक केले आहे.









