मुंबई \ ऑनलाईन टीम
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे दोन दिवसांपूर्वी श्रीनगर येथे गेले असताना त्यांच्यापासून ५०० मीटर अंतरावर बॉम्बस्फोट झाला. देशाच्या सुरक्षाव्यवस्थांना याविषयी काहीच माहिती कशी मिळाली नाही. त्यामुळे या प्रकरणावरून राहुल गांधी यांना संपवण्याचा हा कट तर नव्हता, अशी शंका उपस्थित करत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसतर्फे मंगळवारी हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘व्यर्थ ना हो बलिदान’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले. देशात नोटबंदी केल्यानंतर जम्मू-काश्मीर राज्यातून आतंकवाद्यांचा बिमोड होईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. जम्मू-काश्मीर राज्याला केंद्रशासित म्हणून दर्जा दिल्यानंतर या राज्याची सुरक्षाव्यवस्था केंद्रीय गृहमंत्र्यांकडेच आहे. या पार्श्वभूमीवर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी हे श्रीनगर येथे गेलेले असताना त्यांच्यापासून ५०० मिटर अंतरावरच बॉम्बस्फोट कसा झाला? आतंकवादी हे श्रीनगरपर्यंत कसे पोहोचले, असा प्रश्न उपस्थित करत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केंद्र सरकारच्या कृतीवरच आक्षेप नोंदवला आहे.
देशासाठी गांधी कुटुंबातील दोन व्यक्तींनी बलिदान दिलं आहे. या देशाच्या मातीत त्यांचं रक्त सांडलं. जे राहुल गांधी आज देशाच्या जनतेचा आवाज होऊन देशासाठी काम करत आहेत त्यांना संपवण्याचा हा कट तर नाही हा प्रश्न याठिकाणी निर्माण होतो, असंही यावेळी नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव








